HUTATMA SAHAKARI BANK LTD.,WALWA

Customer Care : 1800 532 8181
IFSC Code: HUSB0000001

अध्यक्षांचा संदेश

सन्मानीय सभासद बंधु- भगिनींनो,

आपल्या बँकेच्या 22 व्या वार्षिक सर्व साधारण सभेस सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल मी व्यक्तिशा व संचालक मंडळातील माझे सर्व सहकारी यांचेवतीने आपणा सर्वाचे हार्दिक स्वागत करतो.

हुतात्मा संकुलाचे संस्थापक,गोरगरीब ,कष्टकरी,शेतकर्‍यांचे दैवत, सर्वसामान्यांचे व आपल्या सर्वांचे भुषण आदरणीय पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ (अण्णा ) नायकवडी .यांची ९६ वी जयंती १५ जुलै २०१८ रोजी साजरी करण्यात आली. अण्णांचे कार्य म्हणजे स्वच्छ व पारदर्शक कारभाराचे प्रतीक आहे आणि हुतात्मा संकुलातील प्रत्येक घटक त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाशी बांधील राहील

मा. संचालक मंडळाच्या वतीने आपल्या बँकेच्या सन २०१७-२०१८ .या आर्थिक वर्षाचा ताळेबंद , नफा- तोटा पत्रक व २२ वा वार्षिक अहवाल सादर करताना मला सार्थ अभिमान वाटतो.

बँकेने गेल्या बावीस वर्षात भरीव प्रगती केलेली आहे. प्रगतीचा हा टप्पा गाठण्यासाठी माझे सर्व सहकारी संचालक, कार्यकर्ते, सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कृतीशील अथक प्रयत्न आपण सर्व सभासद,ठेवीदार,कर्जदार,ग्राहक व हितचिंतक यांचे भक्कम पाठबळ तसेच बहुमोल सहकार्य मिळाले आहे.त्यामुळेच बँकेला आजवरची प्रगति साध्य करता आलेली आहे हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते.

प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार, व्यवसाय अभिरुचिनुसार व परतफेडीच्या कुवतीनुसार कर्जपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपताना बँकिंग व्यवसायाचा समतोल आपल्या बँकेने कायम राखला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने खुल्या अर्थव्यवस्थेवर भर देवून बँकांना आर्थिक स्वायत्तता देण्याचे धोरण चालू ठेवले आहे.ठेवी व कर्जावरील व्याजदरही निर्बंध पूर्णतः काढून टाकले आहेत. बँकांना व्याजदर ठरवण्याची पूर्ण स्वायतत्ता दिली आहे. त्यामुळे बँकांना आपले व्यवसाय धोरण व बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा यांचा ताळमेळ घालणे आवश्यक झाले आहे. या स्पर्धेचा सामना करून प्रगति साधण्यासाठी हुतात्मा बँक सतत प्रयत्नशील राहील.

आपल्या बँकेच्या कर्ज योजना ग्राहकांच्या विविध प्रकारच्या गरजा विचारात घेऊन तयार केलेल्या आहेत.आपले कर्जावरील व्याजदारही अतिशय स्पर्धात्मक आहेत. सभासदांना मी आवाहन करतो की त्यांनी स्वतःच्या व आप्तेष्तांच्या कर्जाच्या गरजेसाठी आपल्या बँकेला पहिली पसंती द्यावी.

कर्जाच्या एन.पी.ए. खातेच्या येणेबाकीवर भारतीय रेझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एन.पी.ए.ची तरतूद करावी लागते.त्याचा नफ्यावर अनिष्ट परिणाम होतो.त्यामुळे थकबाकी व एन.पी.ए. खातेची वसुली करीता नियंत्रण अतिशय महत्वाचे झाले आहे.सबब थकबाकी वसुलीसाठी सामंजस्याच्या तर कधी कठोर कायदेशीर कारवाईचा मार्ग स्विकारणे भाग पडत आहे त्यामुळे सभासद थकबाकीदारांनी त्यांचेकडील संपूर्ण थकरककम विनाविलंब भरून बँकेस सहकार्य करावे अशी विनंती करू इच्छितो.

संचालक मंडळाच्या सर्व सदस्याचे सहकार्य ,एकसंघ वृत्तीचे काम करण्याची पद्धत तसेच पारदर्शक कारभार आणि आजवर संचालक मंडळाच्या धोरणावर आपण दर्शवलेला विश्वास यामुळेच बँकेची आत्तापर्यंतची प्रगति साधने शक्य झाले आहे.

संचालक,सेवक यांच्यामधील सुसंवाद आणि सांघिकवृती,त्याचबरोबर सभासद,ग्राहक,हितचिंतक यांचे पाठबळ यामुळेच प्रगतिची ही अभिमानास्पद वाटचाल कायम टिकवून ठेऊ शकलो आहोत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची व सुचनांची काटेकोर अंमलबाजवणी करून आम्ही बँकेचे धोरण निश्चित करीत आलो आहोत.

बँकेच्या ग्राहकाला केंद्रबिंदू मानून त्यास अचूक व तत्पर सेवा प्रदान करीत आहोत व यापुढेही ती देत राहू असे आश्वासन मी देवू इच्छितो.

Scroll to Top